/ आयुर्वेदिक मार्गदर्शन

शास्त्रोक्त आयुर्वेद आणि आधुनिक जीवनशैलीचा सुवर्णमध्य – डॉ. आनंदी साठये

डॉ. आनंदी साठये BAMS, MD (आयुर्वेद) ,नाशिक

यांच्याकडून विश्वसनीय आरोग्य आणि प्रतिबंधात्मक जीवनशैली मार्गदर्शन.

वैद्यकीय प्रवास

शिक्षण आणि आरोग्य साक्षरता उपक्रम

डॉ. आनंदी साठये यांनी BAMS आणि MD (आयुर्वेद)

माझा वैद्यकीय प्रवास

आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांच्या आरोग्यात आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणणे, हा माझ्या वैद्यकीय प्रवासाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

2008 पासून माधवबागसोबत काम करताना हृदयरोग, मधुमेह, स्थूलता तसेच विविध जीवनशैलीजन्य आजारांच्या व्यवस्थापनामध्ये आयुर्वेदाचा प्रत्यक्ष चिकित्सकीय वापर करण्याचा व्यापक अनुभव मिळाला. विशेषतः हृदयाची पंपिंग क्षमता कमी असलेल्या (Low Ejection Fraction) Heart Failure रुग्णांच्या आयुर्वेदिक व जीवनशैली-आधारित व्यवस्थापनाचा दीर्घ आणि व्यापक अनुभव मिळाला. दीर्घकाळ रुग्णांबरोबर काम करताना औषधोपचाराबरोबरच आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांचे महत्त्व अधिकाधिक जाणवत गेले.

संधिवात, सांधेदुखी तसेच हाडे व मणक्यांच्या विकारांमध्येही आयुर्वेदिक उपचारांचा दीर्घ अनुभव आहे. 2025 पासून पारसनाथच्या माध्यमातून सांधे व मणक्यांचे विकार आणि जीवनशैलीजन्य आजार यावर अधिक केंद्रितपणे काम सुरू केले.

रुग्णसेवेबरोबरच आरोग्य शिक्षण हा माझ्या कामाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. विविध आरोग्यविषयक विषयांवर आजपर्यंत 100 हून अधिक व्याख्याने दिली आहेत. हृदयाच्या आरोग्याबद्दल सामान्य माणसाला सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी “दिल की बात” हा दृकश्राव्य कार्यक्रम सादर केला.

आरोग्यविषयक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत सहज भाषेत पोहोचावी या उद्देशाने “आरोग्य कट्टा” या नावाने आरोग्यविषयक ब्लॉग आणि जनजागृतीचे कार्यही सुरू केले.

त्यांच्या संशोधन आणि वैद्यकीय अनुभवामुळे, त्या आयुर्वेदाची प्राचीन तत्त्वे आधुनिक विज्ञानाशी जोडून, सर्वांसाठी सहज समजण्याजोगा मार्गदर्शन देतात.

आमचे ध्येय

आहार आणि दिनचर्येचे महत्त्व

आयुर्वेद म्हणजे केवळ आजारांवर उपचार नव्हे, तर निरोगी जगण्याची शास्त्रोक्त पद्धत आहे. योग्य आहार आणि दिनचर्येद्वारे आपण अनेक आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. शरीराचे नैसर्गिक संकेत ओळखून, संतुलित जीवनशैली अंगीकारणे हेच दीर्घकालीन आरोग्याचे रहस्य आहे.

आमचे मार्गदर्शन औषधोपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक दृष्टिकोनावर अधिक भर देते. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आहार आणि जीवनशैलीत आवश्यक बदल सुचवून, आम्ही तुम्हाला आरोग्याच्या मार्गावर पुढे घेऊन जातो.

आमची सूत्रे

प्रतिबंधात्मक आरोग्याचे चार स्तंभ

01
02
03
04

शास्त्रोक्त मार्गदर्शन

व्यक्तिगत दिनचर्या

आरोग्य साक्षरता

संतुलित जीवनशैली

आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैद्यकीय संशोधनाची जोड देऊन विश्वसनीय माहिती पुरवणे.

प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आहार आणि जीवनशैलीत सुधारणा सुचवणे.

सामान्य लोकांना आयुर्वेदाची मूलभूत तत्त्वे सोप्या भाषेत समजावून सांगणे.

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहार, विहार आणि विचारांचे संतुलन शिकवणे.

तुमच्या आरोग्यविषयक शंकांसाठी आमच्याशी संपर्क साधा

डॉ. आनंदी साठे यांच्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळवा आणि निरोगी जीवनाकडे पहिले पाऊल टाका.